घटनेचा तपशील

  • Start Date 15/08/2025
  • Start Time 10:00 AM
  • End Date 15/08/2025
  • End Time 11:00 AM

आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन झाली. त्यानंतर संस्थेच्या संचालकांनी डिजिटल पध्दतीने वेबसाईटचे उदघाटन करुन उपस्थितांना साईटची वैशिष्ट्ये सांगितली.

या वेब साईटमध्ये शाळेसंबंधी सर्व माहिती, शै.उपक्रम, विद्यार्थ्यांची माहिती, अभ्यासक्रम, सूचना,प्रवेश प्रक्रिया व इतर माहिती उपल्ब्ध आहे.

ही वेब साईट म्हणजे विद्यार्थी, पालक व मुख्याध्यापक आणि संस्था यांना जोडणारा तांत्रिक पूल च आहे.

डिजिटल शिक्षणाच्या गरजेवर भर देत या वेब साईटच्या माध्यमातून शाळा अधिक प्रगत व सुसंवादी होईल.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री.सहदेव सावंत सर व पदाधिकारी यांच्या हस्ते वेबसाईटचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे चिटणीस मान. श्री. साटम सर व सादरीकरण मान. श्री. विजय जाधव सर यांनी केले. उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी या नवीन पर्वाचे मनापासून स्वागत केले.

बाल विकास विद्या मंदिर शाळेची वेबसाईट तयार करणाऱ्या माननीय श्री. महेश सावंत सर यांचा सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेतील संगणक कक्ष समिती वर कार्यरत असणाऱ्या माननीय श्री. विजय जाधव सर यांचा ही सत्कार करण्यात आला.