प्राथमिक
र. जि. म. ज्ञाति समाज मुंबई या संस्थेने २ ऑक्टोबर १९६७ रोजी बालविकास विद्यामंदिर प्रा.वि या शाळेची स्थापना केली.
शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली शांताराम मुळये बाई होत्या. सदर शाळा मेघवाडीत भरत होती. मुलांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक विकासाबरोबरच इतर क्षेत्रातही मुले चमकू लागली.
२००२ /२००३ या वर्षाचा महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार सौ.वैशाली मुळये बाई यांना त्यावेळचे महापौर मान. श्री. महादेव देवळे साहेब यांच्या हस्ते प्राप्त झाला.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २०१० – २०११ मध्ये सर्वाधिक १५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली.
सन २०२३ मध्ये सहाय्यक शिक्षिका सौ. संध्या सावंत यांना शालेय शिक्षणमंत्री मान. श्री. दिपक केसरकर साहेब यांच्या हस्ते महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.



धावणे, लंगडी, मनाचे श्लोक, नृत्य, कथाकथन इ. आंतरशालेय स्पर्धेत दरवर्षी विद्यार्थी पारितोषिके पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल करीत आहेत. महाराष्ट्र ज्ञानपीठ गणित, इंग्रजी परीक्षा तसेच B. T. S या सारख्या बाह्य परीक्षांना विद्यार्थी बसविले जातात व त्यानां अनेक पारितोषिके मिळतात.
सौ. सुष्मा सावंत, सौ. स्नेहल देसाई, अर्चना जाधव यांना २०२३ – २४ या वर्षाचा सावित्री फातिमा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
चालू शैक्षणिक वर्षात १ ते ४ मध्ये २७० विद्यार्थी शिक्षण घेत असून १ मुख्याध्यापिका, ८ शिक्षिका, १ लिपिक, २ सेवक कार्यरत आहेत.
सुरक्षित व आनंदीदायी वातावरणात सर्वांगीण विकास साधून आत्मनिर्भर भविष्यवेधी तंत्रस्नेही विद्यार्थी घडविणे हे शाळेचे ध्येय आहे.















