कला, उपक्रम आणि सांस्कृतिक

ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षणामुळे विद्यार्थीकडून आधीचे अनुभव व कल्पना जाणून घेता येतात.

जिज्ञासा निर्माण करणारे प्रश्न किंवा कार्य दिले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेता येतो.

त्यामुळे विद्यार्थ्यांची सक्रिय सहभाग वाढतो. समस्या सोडवल्याची क्षमता विकसित होते -सर्जनशीलता व चिंतनशक्ती वाढते. शिकलेले ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहते. सहकार्य व सामाजिक कौशल्ये बळकट होतात.

सर्जनशीलता व आत्मविश्वास वाढविण्यासाठी नृत्य, गायन, वाद्यवृंद अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.

ग्रंथालये ज्ञान आणि माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत आहेत.ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय.

संवाद‌कौशल्य, नेतृत्वगुण व संघभावना विकसित करण्यासाठी गीत समूहगीत स्पर्धा, वादविवाद, वक्तृत्व अशा स्पर्धाचा समावेश होतो.

स्थानिक कला, परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी पारंपारिक पोशाख, लोककला सादरीकरण याना प्रोत्साहन दिले जाते.

शालेय वातावरण आनंदी व प्रेरणादायी करण्यासाठी सण-उत्सव, प्रदर्शन, चित्रकला, हस्तकला कार्यक्रम घेतले जातात.

विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक स्नेह-संमेलनासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांची सुप्त प्रतिमा समाजासमोर येते.

ग्रंथालये ज्ञान आणि माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत आहेत.ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय.