घटनेचा तपशील
- Start Date 15/08/2025
- Start Time 07:00 AM
- End Date 15/08/2025
- End Time 10:00 AM
या वर्षीचा ७९ वा स्वातंत्र्य दिन आमच्या शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ७:३० वाजता सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व मान्यवर शाळेच्या पटांगणात जमा झाले. कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावर्षी दहावीच्या शालान्त परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवून प्रथम आलेली मराठी माध्यमातील अश्मी सावंत व इंग्रजी माध्यमातील प्रसाद नारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
तसेच इयत्ता ९/४ च्या विद्यार्थ्यांनी तिरंगी पेहराव करून देशभक्तीवर नृत्य सादर केले. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीची प्रेरणादायी भाषणे केली. यानंतर इयत्ता ३री च्या विद्यार्थ्यांनी हा देश माझा हे देशभक्तीपर गीत गायले .
राज्यस्तरीय भारत टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ व जिल्हास्तर व केंद्रस्तरावरील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व विजेत्यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विशेष शिक्षकांचा सन्मान बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. त्यांचाही सन्मान करण्यात आला.
बाल विकास विद्या मंदिर शाळेची वेबसाईट तयार करणाऱ्या माननीय श्री. महेश सावंत सर यांचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेतील संगणक कक्ष समिती वर कार्यरत असणाऱ्या माननीय श्री. विजय जाधव सर यांचा ही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विविध समित्यांच्या सहकार्याने झाले. शेवटी अध्यक्षांनी प्रेरणादायी भाषण करून विद्यार्थ्यांना देशभक्ती, प्रामाणिकपणा आणि एकतेचे महत्व पटवून दिले.
राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. अशा प्रकारे १५ ऑगस्ट, २०२५ रोजी स्वातंत्र्य दिन शाळेत अविस्मरणीय पद्धतीने साजरा करण्यात आला.


















