घटनेचा तपशील

  • Start Date 08/05/2026
  • Start Time 02:00 PM
  • End Date 08/05/2026
  • End Time 03:00 PM

बाल विकास विद्या मंदिर या शाळेचे फेब्रुवारी मार्च २०२६ च्या दहावीच्या परीक्षेतील दैदिप्यमान यश.
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई संचालित बाल विकास विद्या मंदिर या शाळेचा फेब्रुवारी, मार्च २०२६ चा दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. सलग दोन वर्ष शंभर टक्के निकाल लावून शाळेने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहेत या कामगिरीचे श्रेय हे रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई संचालित संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक, अधिवेशन प्रमुख व सर्व शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचारी व संगणक कक्षातील कर्मचारी यांना जाते. अशीच परंपरा येणाऱ्या शैक्षणिक वर्षातही चालू राहावी यासाठी शिक्षकांनी १३ जून २०२६ च्या शिक्षक सभेमध्ये निर्धार केलेला आहे.बाल विकास विद्या मंदिर या शाळेचे फेब्रुवारी मार्च २०२६ च्या दहावीच्या परीक्षेतील दैदिप्यमान यश.