घटनेचा तपशील

  • Start Date 15/06/2026
  • Start Time 12:00 PM
  • End Date 15/06/2026
  • End Time 02:00 PM

दिनांक १५ जून २०२६ रोजी बाल विकास विद्या मंदिर जोगेश्वरी पूर्व शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली उपस्थित पालक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रवेशोत्सवाचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे नवागत विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरण स्वागत करणे हा कार्यक्रमाचा मुख्यत: होता यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत होते मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्याच्या आव्हान केले. तसेच पालकांनी ही मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पार पडले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.