घटनेचा तपशील
- Start Date 14/10/2025
- Start Time 11:00 AM
- End Date 14/10/2025
- End Time 02:00 PM
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संचालित बालविकास विद्यामंदिर जोगेश्वरी पूर्व शाळेतील प्राथमिक विभागाच्या शिक्षिका संध्या सावंत यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ प्राप्त झाला आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई या संस्थेच्या वतीने उपशिक्षणाधिकारी (खा.प्रा.शाळा विभाग) सन्मा.श्री. विनोद कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास अधिक्षिका (खा.प्रा. शाळा विभाग) सन्मा. श्रीमती माधुरी महाजन व सन्मा. श्रीमती निशा यादव, विभागनिरीक्षिका (खा. प्रा. शाळा विभाग) श्रीमती भारती भवारी, संस्थेचे कार्याध्यक्ष सन्मा.श्री. सहदेव सावंत, उपकार्याध्यक्ष सन्मा.श्री. गणपत तावडे व सन्मा.श्री.अशोक परब, सरचिटणीस सन्मा.श्री. जितेंद्र पवार, चिटणीस सन्मा. श्रीमती सुरक्षा घोसाळकर व सन्मा.श्री. यशवंत साटम, सहखजिनदार सन्मा.श्री. विजय खामकर, आरजे एमडी इंग्लिश स्कूलचे सीईओ सन्मा.श्री. दीपक खानविलकर, मुख्याध्यापिका सन्मा. नेत्रा दळवी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका सौ. विशाखा तांबे यांनी केले.




