घटनेचा तपशील
- Start Date 07/10/2025
- Start Time 11:00 AM
- End Date 07/10/2025
- End Time 02:00 PM
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संचालित बाल विकास विद्या मंदिर जोगेश्वरी पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब तर्फे मोफत बूट वाटप व खाऊ वाटप करण्यात आले
बाल विकास विद्या मंदिर शाळेतील शिक्षिका सौ. संध्या सावंत यांच्या प्रयत्नाने हा विद्यार्थी उपयोगी उपक्रम करण्यात आला. या कार्यक्रमास इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सोनाली अय्यर, श्रीमती भारती बिदारी, श्रीमती जयसिंटा मचांडो, श्रीमती सोनिया मल्होत्रा या प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या. शाळेत आलेल्या पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी औक्षण करून, छान छान गाणी नृत्य सादर करून स्वागत केले. त्यानंतर मुख्याध्यापिका सन्मा.सौ. नेत्रा दळवी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तदसमयी संस्थेचे कार्याध्यक्ष सन्मा. श्री सहदेव सावंत सर , संस्थेचे उपकार्याध्यक्ष सन्मा.श्री. अशोक परब सर, चिटणीस सन्मा.श्री. यशवंत साटम सर, सहखजिनदार सन्मा. श्री विजय खामकर सर, आरजे एमडीएस इंग्लिश स्कूलचे सीईओ सन्मा.श्री दीपक खानविलकर सर, कार्यकारणी सदस्य सन्मा. श्री सुशील चव्हाण सर उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष सन्मा. श्री सहदेव सावंत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व इनरव्हील क्लबने केलेली मदत याबद्दल क्लबच्या सर्व सदस्यांचे धन्यवाद मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ विशाखा तांबे यांनी केले.




