घटनेचा तपशील
- Start Date 22/09/2025
- Start Time 11:00 AM
- End Date 22/09/2025
- End Time 03:00 PM
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आयोजित ‘ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार ‘ २०२४-२५ प्रदान समारंभ नरिमन पॉईंट मुंबई येथे पार पडला.
जोगेश्वरी पूर्व येथील बाल विकास विद्यामंदिर ( प्रा.वि.) शाळेतील शिक्षिका संध्या सावंत यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२४-२५ यावर्षीचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मा. अजितदादा पवार, शालेय शिक्षणमंत्री सन्मा. दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी विधानसभा सभापती एडवोकेट सन्मा. राहुल नार्वेकर, विधान परिषद सदस्य शिक्षक आमदार सन्मा. जगन्नाथ अभ्यंकर व राज्यमंत्री सन्मा.डॉ. पंकज भोयर, शालेय विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह उपस्थित होते. यावेळी राज्यातील १०९ आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकवृंदांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




