वर्ग व वर्गखोल्या

शाळेच्या इमारतीत एकूण १४ वर्गखोल्या आहेत. इयत्ता १ ली ते १० वी पर्यतचे वर्ग आहेत. इमारतीत प्रयोगशाळा, वाचनालय , संगणक कक्ष  आहे. तीन स्मार्ट रूम आहेत शाळेत ई – लर्निग सुविधा आहे. तसेच तीन वर्गात प्रोजेक्टर आहेत.

बाल विकास विद्या मंदिर माध्यमिक विभागात कोटक एज्युकेशन फाउंडेशन तर्फे इंग्रजी स्पोकन क्लास घेणार आहोत तसेच रोबोटिक प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. युवा प्रतिष्ठान तर्फे शाळेला १५ लॅपटॉप मिळाले आहेत. या संस्थेकडून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण  दिले जाते.