परिसर

बाल विकास विद्या मंदिर आमच्या शाळेच्या मैदानात ही चार मजली शाळेची इमारत आहे. तसेच मैदानातील वातावरण आनंददायी व सुरक्षित आहे. मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. शाळेच्या मैदानात अनेक झाडे आहेत, हिरवळ आहे. सुव्यवस्थित मैदान म्हणजे चांगले नियोजन आणि व्यवस्थापनेद्वारे तयार केलेले आणि राखलेले क्रीडांगण किंवा खेळाचे मैदान यात खेळांसाठी योग्य जागा, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण तसेच आवश्यक सुविधांचा समावेश असतो.

मैदानावर कवायत, कसरत प्रकार, साहित्ययुक्त लेझीम , आनापन( ध्यानधारणा ) योगासने, प्रात्यक्षिक तसेच मैदानी खेळ लंगडी / डोज बॉल / कबड्डी इ. घेतली खेळ खेळले जातात.

मुलांसाठी खेळाच्या मैदानाचे फायदे

बाहेर राहिल्याने सर्व  प्रकारच्या मुक्त खेळांना प्रोत्साहन मिळते आणि मुलांना त्यांचे वातावरण समजून घेण्यास मदत होते. खेळाचे मैदान मुलांना विविध अनुभव आणि संधी प्रदान करते, ज्यात समाविष्ट आहे:-

  • शारीरिकदृष्ट्या सक्रीय असणे, 
  • आव्हान स्वीकारणे आणि जोखीम घेणे,
  • मित्रांसोबत गप्पा मारणे,
  • सहकार्य करायला शिकणे,
  • त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून स्वतंत्रपणे खेळणे.
3000
चौरस फूट कॅम्पस क्षेत्र
4
मजली इमारत
900
चौरस फूट मोकळे मैदान

सीसीटीव्ही कॅमेरा

शाळेतील प्रत्येक  वर्गात व कार्यालयात शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमरे बसविले आहेत एकूण कॅमरे ३८ आहेत.