संस्थेचे अध्यक्ष

श्री मोतीराम विश्वासराव

अध्यक्ष

 र.जि.म.ज्ञा. समाज, मुंबई

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज ही संस्था स्थापन होऊन आज सुमारे ६३ वर्षांचा कालावधी झालेला आहे. संस्थेच्या स्थापने पासून मला या संस्थेत वावरण्याची संधी मिळाली ती म्हणजे माझे जेष्ठ बंधू प्रभाकर राजाराम विश्वासराव व  वि.ना. शिंदे या समाजासाठी तळमळणाऱ्या जागृत सदस्यांमुळे. मी ६५ वर्षांपूर्वीचा जोगेश्वरी (पू) हा विभाग म्हणजे बकाल वस्ती, तबेल्यांचे जाळे, परप्रांतीय लोक, आणि लालबाग, परळ नायगाव, भायखळा या विभागातून आर्थिक दुर्बळ वर्गातून मुंबई बाहेर फेकले गेलेले लोक. यात प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हातील गरीब लोकांची वस्ती. या काळात जोगेश्वरीत शाळा, कॉलेज नसल्यामुळे शिक्षणाची प्रचंड गैरसोय.

आर्थिक बिकट परिस्थितीमुळे मोठया शाळा कॉलेजात प्रवेश अवघड. अशा बिकट परिस्थितीत, राव गुरुजींनी रॉकेलच्या दिव्याखाली सुरू केलेला लहान बालवाडी हाच प्रमुख आधार. वि.ना. शिंदे हे राव गुरुजींचे जिवलग मित्र व तळमळीने कार्य करणारेसुसंस्कृत गृहस्थ. यांच्या प्रेरणेने या १२ मुलांच्या बालवाडीचे बाल विकास विद्या मंदिर या संस्थेत रूपांतर झाले. यांना समाजातील श्री भास्कर, कदम, मनोहर शेलार, पालकर गुरुजी डी.जी. कदम यांच्यासारख्या तळमळीच्या कार्यकर्त्यांची साथ लाभली. झोपडीत सुरू झालेल्या बालवाडीने कालांतराने बाल विकास विद्या मंदिर या भव्य शाळेचे रूप धारण केले. शाळेचा विकास होत असताना सहदेव सावंत, मंगेश पंडित, प्रमोद पंडित, एकनाथ दळवी, ज. विश्वासराव, अनंतराव  भोसले,ग.हो. तावडे, विश्वनाथ सावंत, माधव सर या साऱ्यांनी निष्ठेने, भावनेने साथ दिली. त्यामुळेच आज बाल विकास विद्या मंदिर या शाळेची भव्य इमारत सर्वोदय नगर येथे उभी आहे.

मराठी माध्यमाची एक नावारुपास आलेली शाळा म्हणजे आत्ताच्या सुधारलेल्या जोगेश्वरीला मोठा शैक्षणिक आधार आहे असे वाटते. मराठी माध्यमांच्या या शाळेत एकाच वेळी सुमारे ६५०० मुले शिक्षण घेत होती.

आता शैक्षणिक पर्व बदलले आहे. इंग्रजीचा ओढा वाढलेला आहे .अशा अवघड परिस्थितीत देखील. बाल विकास विद्या मंदिर मराठीचे वैभव राखून आहे. या सर्व घडामोडीत आर्थिक परिस्थिती बेताची असून देखील आमच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनतीने या प्रकल्प यशस्वीपणे उभा केला त्याचा मला  आनंद आहेच, परंतु अभिमान देखील आहे. या कालावधीत मला माझी नोकरी सांभाळून सहकार्य करण्याची संधी मिळाली त्याचा मला  आनंद आहे.

आज मी या संस्थेच्या प्रमुख पदावर कार्यरत आहे. संस्थेने एका परीने माझा सन्मानच केला आहे असे मी समजतो.

आम्ही सर्वजण आर्थिक परिस्थितीतून ही संस्था / शाळा उभी केली आहे. आमच्यात कोणी  श्रीमंत, अनुकूल बळ असलेला नव्हता. आम्ही सर्व साधारण नोकरदार होतो. परंतु ध्येय वेडाने भारावलेले असल्यामुळे प्रसंगी घरची आर्थिक अडचण सहन करून या क्षेत्रात वावरत आहोत.

 संस्थेला प्रगती करण्याची प्रबळ इच्छा आहे. परंतु आर्थिक बळाची गरज आहे. मी विनंती करतो की माझ्या संस्थेची आपली बाजू बळकट करण्यासाठी सरळ हस्ताने मदत करा. जेणेकरून संस्था, शाळा, कॉलेज, तांत्रिक कॉलेज उभे करू शकेल. या काळात शिक्षक, पालक, विद्यार्थी, शुभचिंतक यांनी  दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.||

कार्याध्यक्ष

श्री सहदेव सावंत

कार्याध्यक्ष – र.जि.म.ज्ञा. समाज, मुंबई

अध्यक्ष - आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल

साठ वर्षे शैक्षणिक प्रगतीची व सामाजिक बांधिलकीची!

दिनांक ८ ऑक्टोबर, १९६२ रोजी कै. श्री वि.ना. उर्फ भाऊ शिंदे यांनी मराठा समाजातील निवडक कार्यकर्ते घेऊन रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई या संस्थेची स्थापना केली. आताचा सिंधुदुर्ग जिल्हा त्यावेळी रत्नागिरीमध्ये समाविष्ट होता. उद्देश होता मराठा समाज बांधवांना एकत्र करणे व समाज उन्नतीला हातभार लावणे. समाज उन्नतीसाठी  शिक्षण प्रसाराचे काम करावे असा विचार आला  व शाळा सुरू करण्याचे ठरवले.

कै. प्रभाकर विश्वासराव यांचा शिकवणी वर्ग सुरू होता. ती मुले घेऊन दि. २ ऑक्टोंबर १९६७ रोजी गांधी जयंतीच्या शुभमुहूर्तावर बाल विकास विद्या मंदिर शाळेची जोगेश्वरी येथे मुहूर्तमेढ रोवली गेली. जोगेश्वरी, श्यामनगर येथील चाळीमध्ये अल्पभाड्याने बालवर्ग सुरू झाला. पूर्व प्राथमिक विभागाच्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून सौ. मंगला विष्णु शिंदे यांनी कार्यभार सांभाळला. शाळेला मान्यता मिळेपर्यंत मुलांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून परिक्षेस बसविण्यात येत होते. सौ. वैशाली मुळये या प्राथमिक विभागाच्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. यांनी गुणवत्ता व शिस्त या जोरावर शाळेला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. जोगेश्वरीतील पालकांनी प्राथमिक शाळेला उदंड प्रतिसाद दिला व माध्यमिक विभागाची मागणी केली. एव्हाना छोट्याशा चाळीचे एक मजली इमारतीत रूपांतर करण्यास संस्थेस यश आल. इ. ८ वी चे वर्ग सुरू झाले. कै. श्री सुमन चौगुले, एल.एल.बी.. बी.एड् हे माध्यमिक विभागाचे पहिले मुख्याध्यापक झाले. चोगले सर हे संस्था व शाळा यांच्या प्रगतीसाठी झटू लागले. शाळा शिशुवर्ग ते दहावी पर्यंत दर्जेदार शिक्षण देऊ लागली.

शाळेत शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक पर्यावरण इ. क्षेत्रात शाळेची मुले चमकू लागली. उपनगरामध्ये बाल विकास विद्या मंदिर ने आपला ठसा उमटविला. मुख्यध्यापक श्री. चोगले सरांनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी खूप मेहनत घेतली.  एवढेच नाही तर सरांनी निवृत्तीच्या वेळी मिळालेली सर्व रक्कम ७,१४,५५१/- शाळेस देणगी दिली. त्यांच्या रकमेतून चोगले सभागृह बांधण्यात आले व शाळेला सभागृहाची मोठी सोय झाली. शाळा कै. सुमन चोगले यांची शतश: ऋणी आहे.

त्यानंतर डॉ. सौ. अपेक्षा खामकर मुख्याध्यापिका झाल्या. त्यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्याचबरोबर मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात शाळेचे नाव केले.

विज्ञानप्रदर्शन, विविध स्पर्धांमध्ये शाळेच्या मुलांना नेत्रदिपक यश मिळवून दिले. त्यांच्या कारकिर्दीत, मयुरी कदम शालान्त परीक्षेत मराठी विभागातून मुंबईमध्ये पहिली आली व शाळेच्या यशात आपला एक मानाचा झेंडा रोवला गेला. त्यावेळी विद्यमान मुख्याध्यापिका सौ. नीला वर्तक ह्या मराठीच्या शिक्षिका होत्या. मयुरीच्या यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. मुख्याध्यापिका सौ. नीला वर्तक यांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्यानंतर सौ. सुशीला पाटील व आजचे मुख्याध्यापक श्री जगदीश सूर्यवंशी यांनीही माध्यमिक विभाग कार्यक्षमतेने सांभाळला आहे.

शाळेला  विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळाला. शालेय शिक्षणांबरोबर शाळेचे आधुनिक कॉमेंट कॉम्प्युटर नावाने संगणक कक्ष आहे. शाळेमध्ये संगीताचे वर्ग, कराटे, शिक्षण दिले जाते. डान्स अकॅडमी आहे. विविध खेळ शिकवले जातात. अंबिका योग कुटीरच्या माध्यमातून योग वर्ग व त्याचबरोबर एकाग्रता व श्वसनप्रकारासाठी ब्रम्हविद्या वर्ग चालविले जातात.

काळाची गरज लक्षात घेऊन संस्थेने २००४ साली जोगेश्वरीतील पालकांच्या आग्रहाखातर  आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल सुरू केले. या शाळेचा शालान्त परीक्षेचा निकाल दरवर्षी १००% लागतो. या इंग्लिश स्कूलला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. व शाळा सर्व आघाडीवर  प्रगती करीत आहे.

अशा प्रकारे उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संस्था व शाळा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. दर्जेदार शैक्षणिक कार्याची ५८ वर्ष पूर्ण करताना हा ज्ञानयज्ञ असाच अखंड सुरू राहणार  आहे हीच आमची समाजाप्रति बांधिलकी.

सरचिटणीस

श्री जितेंद्र दत्ताराम पवार

र.जि.म.ज्ञा. समाज, मुंबई

आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल मेंबर ऑफ द बोर्ड

रत्नागिरी जिल्हयातील मराठा तरुणांनी एकत्र येऊन जोगेश्वरी सारख्या मध्यम वर्गीय मराठी वस्तीत १९६२ मध्ये समाजाची संस्था काढायचा ध्यास घेतला. एका ध्येयाने वेडे झालेले हे तरुण ८ ऑक्टोबर, १९६२ रोजी कै. विष्णू (भाऊ) नारायण शिंदे आणि कै. प्रभाकर राजाराम विश्वासराव (राव गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था स्थापन करून मराठा समाजाचा उत्कर्ष करण्याची मुहूर्तमेढ रोवून वाटचाल करु लागले. मराठा समाज हा फक्त लढाई वा शेती हया क्षेत्रात वाकबगार नसून शैक्षणिक क्षेत्रात देखील यशस्वी होऊ शकतो हे निःसंशय मुंबईत दाखवून दिले. सुरुवात २५ पैसे ते जास्तीत जास्त ११.०० रुपये अशी वर्गणी रुपात गोळा करून अडचणींवर मात करून आजचे रुप संस्थेला प्राप्त करुन दिले, त्यांचे सर्वप्रथम विनम्र अभिवादन!

हया ध्येयवेड्या मराठा तरुणांना समाज बांधवानी साथ दिल्यामुळे त्यांनी शैक्षणिक कार्यात उडी घेतली. प्रथम मराठी माध्यमाच्या शाळेचा बाल विकास विद्या मंदिर हया नावाने श्रीगणेशा केला.

ज्या उ‌द्देशाने मराठी शाळेची स्थापना २३ ऑक्टोंबर १९६७ रोजी झाली. ती ५८ वर्षे सफल झाली. कारण स्थापनेपासून शालांत परीक्षेचा असा अविस्मरणीय १००% निकाल हा यावर्षी प्रथमच लागला.

यासाठी ज्यांनी ज्यांनी कठोर परिश्रम घेतले ते वि‌द्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन!

पुढील दोन वर्षांनी शाळा हीरक महोत्सव साजरा करणार. म्हणजेच अपूर्व यशाची तयारी २०२४-२५ च्या तुकडीने केली त्याब‌द्दल यांचे आभार!

संस्थापकांना नक्कीच आनंद झाला असेल, त्याप्रमाणे सर्व सभासद हितचिंतकांना देखील या संस्थेशी निगडित असल्याबद्दल अभिमान वाटत असेल.

आपली जगासोबत नाळ जोडण्यासाठी सदर Website तयार करत आहोत. नवयुगातील माध्यमांचा सर्व निगडित व्यक्तींनी लाभ घ्यावा आणि काही सूचना असतील त्या देखील जरूर कराव्यात ही नम्र विनंती!

छत्रपतींच्या रयतेच्या उत्कर्षाचा वारसा ही संस्था निर्विवादपणे ६० वर्षे चालवत आली आहे आणि राहील यात शंका नाही.

Why Choose Us

Experienced Faculty

At vero eos et accusamus et iusto odiodignissimos laborumducimus qui blanditiis praesentium voluptatum dolor sit

Modern Library

At vero eos et accusamus et iusto odiodignissimos laborumducimus qui blanditiis praesentium voluptatum dolor sit

Popular Courses

At vero eos et accusamus et iusto odiodignissimos laborumducimus qui blanditiis praesentium voluptatum dolor sit

100% Scolarship

At vero eos et accusamus et iusto odiodignissimos laborumducimus qui blanditiis praesentium voluptatum dolor sit

Guranteed Career

At vero eos et accusamus et iusto odiodignissimos laborumducimus qui blanditiis praesentium voluptatum dolor sit

Certified Teacher

At vero eos et accusamus et iusto odiodignissimos laborumducimus qui blanditiis praesentium voluptatum dolor sit