५८ वर्षांचा अनुभव
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. वि.ना. शिंदे (भाऊ) व कै. प्रभाकर राजाराम विश्वासराव यांनी लावलं. हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली.
आमच्या रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई ह्या विद्यमान संस्थेच्या अथक प्रयत्नाने मुंबईतील जोगेश्वरी झोपडपट्टी वसाहतीमधील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे आणि चांगले संस्कार घडावेत या उद्देशाने सन १९६७ सालामध्ये बाल विकास विद्या मंदिर या शाळेची स्थापना झाली.आज या शाळेला ५८ वर्षं पूर्ण झालीत.
शिक्षण हे पवित्र कार्य आहे शिक्षणाने समाज घडतो शिक्षण ही सध्या काळाची गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु समाजात क्रांती घडत असल्याने शिक्षणाची गरज म्हणजे समाजातील महत्त्वाचा घटक बनला आहे.
सामाजिक राजकीय, क्रीडा व धार्मिक क्षेत्रपेक्षा शैक्षणिक कार्य अतिशय अनमोल व पवित्र कार्य आहे. आम्ही रोपट लावलं, त्याची वटवृक्षात वाढ होत असल्याने आम्हाला खूपच अभिमान वाटत आहे. शिक्षण प्रेमी पालक सर्वसामान्य व्यक्ती, आमच्या सदस्य आणि हितचिंतक यांच्या पाठबळावरचा शाळेची उभारणी करून आम्ही पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभाग, स्वरसाधना संगीत प्रशिक्षण वर्ग, कराटे व मलखांब शिक्षण, व्यायाम शाळा, नृत्यकला प्रशिक्षण वर्ग. विद्यार्थी वस्तु भांडार, योगासन वर्ग ही मोठी गरुड झेप फक्त आपल्या सहकार्यामुळेच हे त्रिवार सत्य.
तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण देण्याची आमची योजना कालसुसंगत आहे. अभ्यास हा सक्तीचा नसून तो विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कणागुणांना प्रोत्साहन देणारा असावा. शिक्षणाची ज्ञानार्जनाची गोडी प्रत्येक विद्यार्थ्याला लागणे महत्त्वाचे आहेच, पण त्यासोबत जगाशी जोडण्याची वृत्ती देशाभिमान आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव त्यांना करून देणे गरजेचे आहे. शिक्षणासोबतच मानवता, स्वच्छता ही मूल्ये या विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात आम्ही प्रयत्नशील आहोत आपले सहकार्य हीच आमची प्रेरणा.
कार्यक्षम संस्थाचालकांचे योगदान
संस्थेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे अनुदानाकारीत अर्ज केला आणि १९७८ पासून शाळा अनुदान मिळण्यास पात्र झाली. त्यावेळी शाळेचा पट होता ३००. त्यानंतर संचालकांची ध्येयपुर्तेची आस, पालकांचे मुक्त हस्ते मिळालेले सहकार्य आणि कर्मचारी यांची कर्तव्यनिष्ठा यामुळे २००० साली सर्वोदय नगर मेघवाडी येथे सर्व सुखसोयींनी युक्त अशी शाळेचे ४ मजली इमारत तयार झाली.
जोगेश्वरी (पूर्व) विभागातील आमच्या गोर गरीब जनतेच्या पाल्यांना जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा देऊन उत्तम शालेय शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे वाचनालय , विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम, खेळण्यासाठी क्रीडांगण, कराटे, संगीत प्रशिक्षण, नृत्यकला या सर्वच सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असून अजूनही जास्तीत जास्त सुधारणा करण्यामध्ये संस्था आणि शाळा प्रयत्नशीलआहे.
आमचे यश
५०
शाळेतील शिक्षक
१००
शालेय निकाल – २०२४-२५
१२०००
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी (आजपर्यंत)
१२००
आजपर्यंत जिंकलेले सन्मान व पुरस्कार
गेल्या काही वर्षांपासून बदललेल्या समाज दृष्टिकोनामुळे सर्वच मराठी माध्यमाच्या शाळांना उतरती कळा लागली आहे. अशा परिस्थितीत सुध्दा बाल विकास विद्या मंदिर उतोरोत्तर प्रगती करत आहे.आज आपली शाळा जोगेश्वरी विभागातील सर्वोत्त्कृष्ट शाळा म्हणून गणली जाते ही बाब भूषणावह वाटते.
आजही आजूबाजूच्या सर्व मराठी शाळा बंद होत असताना आपल्या शाळेची पटसंख्या सर्व विभागांची मिळून ९०० च्या आसपास आहे. व आजूबाजूच्या सर्व शाळांतील शिक्षक सरप्लस होत असतांना आपल्या शाळेतील सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची संख्या ४५ च्या घरात आहे. याचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवणाऱ्या आमच्या सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापकांना व सर्व सुविधा पुरविणाऱ्या संचालक मंडळास जाते.
मार्च २००६ मध्ये झालेल्या शालान्त परीक्षेत कु. मृण्मयी मीनानाथ नवार ही ९३.०६ टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत मुंबई विभागातून १६ वी आली व शाळेचे नाव चमकविले आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा शाळेचा निकाल १००% लागला आहे.
आम्ही काय करतो
मार्च २००४ साली झालेल्या शालान्त परीक्षेमध्ये कुमारी पल्लवी सहदेव शिरसाट ९४.४६ टक्के गुण मिळवून शाळेच्या गौरवात अधिक भर टाकली. मार्च २०१० मध्ये मयुरी कदम मराठी विषयात ९५ गुण मिळवून मुंबई विभागातून प्रथम येण्याचा मान मिळवला.
मार्च २०२४ मध्ये ९७ टक्के गुण मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे. फेब्रुवारी २००८ साली झालेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे १० विद्यार्थी झळकले तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ४ विद्यार्थी झळकले.त्याचप्रमणे अभ्यासाबरोबर खेळातही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे.
Why Choose Us
Experienced Faculty
At vero eos et accusamus et iusto odiodignissimos laborumducimus qui blanditiis praesentium voluptatum dolor sit
Modern Library
At vero eos et accusamus et iusto odiodignissimos laborumducimus qui blanditiis praesentium voluptatum dolor sit
Popular Courses
At vero eos et accusamus et iusto odiodignissimos laborumducimus qui blanditiis praesentium voluptatum dolor sit
100% Scolarship
At vero eos et accusamus et iusto odiodignissimos laborumducimus qui blanditiis praesentium voluptatum dolor sit
Guranteed Career
At vero eos et accusamus et iusto odiodignissimos laborumducimus qui blanditiis praesentium voluptatum dolor sit
Certified Teacher
At vero eos et accusamus et iusto odiodignissimos laborumducimus qui blanditiis praesentium voluptatum dolor sit

