शिक्षक आणि विद्यार्थी विकास
नमस्कार ,
बालविकास विद्या मंदिर प्राथमिक विभागाच्या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून काम करताना मी अभिमानाने सांगू इच्छिते की ही माझी बालविकास विद्यामंदिर मराठी माध्यमाची शाळा ही केवळ शिक्षण देणारी शाळा नसून संस्कारांची पवित्र भूमी आहे .येथे येणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ शिक्षण घेण्यासाठी नाही तर चांगला नागरिक बनण्यासाठी येतो. ज्ञान, शिस्त, परिश्रम, संस्कार आणि आनंददायी वातावरण यांचा सुंदर संगम म्हणजे माझी शाळा. माझ्या शाळेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमच्या शाळेने नेहमीच गुणवत्तेला व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला आहे. गुणवान, मेहनती, प्रेरणादायी शिक्षकांचे परिश्रम, विद्यार्थ्यांची जिद्द आणि पालकांचा विश्वास तसेच संस्थेचा प्रबळ पाठिंबा यामुळेच आज आमची शाळा प्रगतीच्या शिखरावर आहे. फक्त अभ्यासालाच प्राधान्य न देता कला, क्रीडा, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा समतोल विकास घडवणे हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठीच आमच्या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचाही सहभाग असतो.
मला अभिमान आहे की माझी बालविकास शाळा समाजासाठी जबाबदार, सृजनशील, संवेदनशील, राष्ट्रप्रेमी, आत्मविश्वासपूर्ण नागरिक व एकविसाव्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आत्मनिर्भर विद्यार्थी घडवत आहे.
माझे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि आमच्या रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज संस्थेचे पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्याने आमच्या शाळेने उपनगरातील एक नामांकित शाळा म्हणून कमावलेले नाव अधिक उंचीवर ठेवून प्रत्येक घटकाला अभिमान वाटेल असे काम सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने करून दाखवू याची खात्री मी देते.
🙏 धन्यवाद 🙏
मुख्याध्यापिका
सौ.स्नेहल देसाई